अमळनेर : तीन दिवसांच्या बंदीनंतर अमळनेर बाजार समितीत जिल्हा व जिल्ह्याबाहेरून शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. शेतकऱ्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे आणि कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी माजी आ. साहेबराव पाटील यांनी तब्बल १२०० शेतकऱ्यांना जागेवर जाऊन डोक्यावर बांधण्यासाठी रूमाल आणि तोंडाला लावण्यासाठी मास्कचे मोफत वाटप केले. यावेळी बाजारसमिती सभापती प्रफ्फुल पाटील, नगरसेवक निशांत अग्रवाल, नगरसेवक राजेश पाटील, प्रा.रामकृष्ण पाटील, गोपाळ बागुल, रवींद्र पाटील, शफी मास्तर उपस्थित होते.