जळगाव ;- जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या फ्रान्सच्या पर्यटकाला जळगावात आल्यानंतर वाहन किंवा राहण्यास हॉटेल उपल्बध न झाल्यानेपोलिसांच्या मदतीने तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले होते .जुलिअन सर्च पेरी वय ३८ याला कोरोना विषाणू संसर्ग न झाल्याचे तपासणींतर्गत सिद्ध झाल्याने त्याला आज दुपारी एक वाजता रोटरी ईस्ट आणि जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून एका वाहनातून मुंबईकडे रवाना करण्यात आल्याची माहिती रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली . दरम्यान माजी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी फ्रान्सच्या पर्यटकाला सुरक्षित मुंबईला पोहचविण्याच्या सूचना केल्या होत्या . त्यानुसार त्यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांनी स्वतःचे वाहन देऊन विदेशी पर्यटकाला रवाना केले .
जिल्हा रुग्णालयातून सुटल्यानंतर त्यांच्या राहण्याची व्यवस्था पद्मालय रेस्ट हाऊसला करण्यात आली होती . रात्री मुंबईला पोहचल्यानंतर पेरी यांना फ्रान्सच्या दूतावासाकडे सोपविण्यात येऊन त्यांची पुन्हा मायदेशी रवानगी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले .