अमळनेर:-तालुक्यातील वासरे येथील ९ वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटनाला आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली आहे . आईवडील शेतीच्या कामानिमित्त शेतात गेले असता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . चंदन विजय पाटील असे या मुलाचे नाव आहे.दरम्यान, चंदन याने गळफास घेतल्याचा प्रकार घराजवळ राहणाऱ्या दीपक पाटील यांच्या लक्षात आला असता त्यांनी पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला. तेथून चंदनला ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.सदर घटनेचा पुढील तपास पो.ना.मुकेश साळुंखे करीत आहेत.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.