24 तासात रुग्णांच्या संख्येत वाढ ; कोरोनाबाधित रुग्नांची संख्या @ 1083 वर
जळगाव ;- जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर सुरूच असून आज दुपारी प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुन्हा 63 नवे रुग्ण आढळून आले असून कोरोनाबाधित रुग्नांची संख्या @ 1083 वर पोहचली आहे . 24 तासात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने जळगावकरांच्या चिंतेत भर पडली असून अजूनही नागरिक फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करीत नसल्याने याचा फैलाव होत आहे . आज दुपारी प्राप्त माहितीनुसार जळगांव ग्रामीण – 0 ,जळगांव शहर – 12 ,भुसावळ – 10 , अमळनेर – 15 , चोपडा – 1 , पाचोरा -0 , भडगांव – 0 , धरणगांव – 2 , यावल – 8 , एरोंडोल -4 जामनेर – 3 ,रावेर – 4 , पारोळा – 0 , चाळीसगांव – 2 , मुक्ताईनगर – 0 , बोदवड – 1 दुसऱ्या जिल्ह्यातील-1 असे दिवसभरात एकुण 63 पॉझीटीव्ह रुग्ण आज आढळलेले असुन , जिल्ह्यातील एकुण पॉझीटीव्ह संख्या 1083 झाली आहे . आतापर्यंत 118 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 478 जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहे.आणि 429 जणांवर उपचार सुरु आहे.