पहान ता. पाचोरा;- पाहान येथे आदर्श विवाह सोहळा सपंन्न झाला . डॉ. सुभाष दौलत पाटील यांचे पुतणे व कै. नेताजी दौलत पाटील यांचे चिरंजीव निलेश आमडदे, ता.भडगाव जि.जळगाव येथील कै.भास्कर दयाराम पाटील यांची नात व श्री भरत भास्कर पाटील यांची कन्या यांचा पहान येथे शुभ विवाह एकदम साध्या व लॉकडाऊनच्या पूर्ण नियमानुसार शासकीय नियमानुसार विधी पार पडला. विशेष करून चि.निलेश चे 5 काका व बहिण मेहुणे मुबई व पुणे येथे आहेत .परंतु लाँकडाऊन मुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांनी वधु वर यांना सोशल मीडिया च्या माध्यमातून शुभ आशिर्वाद दिलेत. या प्रसंगी वधूचे आई वडील व मामा मामी होते व सर्व या विवाहा सोहळ्या चे नियोजन डॉ सुभाष दौलत पाटील यांनी केले. तरी परिसरात या लग्न सोहळ्या चे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.