जळगाव ;- जळगाव जिल्हातील आज पर्यंत ३८१ रुग्ण वाढवून आलेले आहे व ४६ रुग्णांचे कोविड कोविड – १९
मुळे मृत्यू झालेले आहेत, येत्या काळामध्ये ‘ ही साथ वाढण्यावी शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हयातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग व कोविड १९ विषाणू मुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या उपचाराकरीता आपातकालीन व्यवस्था म्हणून गणपती हॉस्पीटल जळगाव हे कोविड हॉस्पीटल म्हणून घोषित अधिग्रहण केलेले आहे. तरी वैद्यकिय अधिकारी यांची आवश्यकता असल्याकारणाने डॉ.नरेश पाटील, नेरी ता.जामनेर , डॉ..विकमसिंग घोगले ,धामणगाव डॉ.राजेश एस जेन, बेटावद ,डॉ.शांताराम ठाकुर, वरखेडी पाचोरा , डॉ.रविंद्र टिके, थोरगव्हाण , डॉ.नसिमा याकुब तडवी, सावखेडा यांना तात्काळ रुजू होण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी एका पत्रकान्व्ये काढले आहेत .