नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने लॉकडाउनच्या काळात पॅसेंजर ट्रेन देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, रेल्वे वाहतूक १२ मेपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने यासाठी नियोजन आखले आहे. सुरुवातीला कमी संख्येत विशेष रेल्वे गाड्या धावतील. यादरम्यान प्रवाशांची आरोग्य आणि कोरोना तपासणी केली जाईल. फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. उद्या संध्याकाळपासून रेल्वेचे आरक्षण सुरू होईल. सुरुवातीला नवी दिल्लीतून काही स्पेशल ट्रेन्स धावतील देशातल्या १५ मुख्य शहरांपर्यंत प्रवास करतील आणि अडकलेल्या प्रवाशांची ने-आण करतील, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करत दिली आहे.