चाळीसगाव ;- शहरातील भरवस्तीत असलेल्या दत्तवाडीतील शनिमंदिरातील दोन पेट्या चोरट्यांनी चोरून शेजारील भाजी मार्केटमध्ये त्या उघडून त्यातील हजाराचा ऐवज लंपास केला शनिवारी सकाळी मंदिराच्या बाजूला राहणारे अजय गंगाराम जोशी हे झोपेतून उठल्यावर त्यांच्या दरवाज्याची कडी बाहेरून लावलेली आढळली. त्यांनी शेजारच्यांना आवाज देऊन दरवाज्याची कडी बाहेरून उघडून घेतली . तसेच शंका आल्याने मंदिराकडे पाहिले असता मंदिराचा दरवाजा उघडा दिसला. आतजाऊन पाहिले असता दोघी दांनपेट्या गायब असल्याचे निदर्शनास आले . त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळविले असे अजय जोशी यांनी सांगितले . पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.