जळगाव ;- १६जुन रोजी News 18 च्या संपादक अमिष देवगन यांनी ऎका लाईव्ह चर्चे वेळी भारताचे सुफि संत ख्वाजा गरीब नवाज अजमेर यांना अतिरीकी संत व “लुटेरा चिस्ती ” असे संबोधून इस्लाम धर्माचे तसेच ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांचे देश-विदेशात असलेल्या कोटी कोटी श्रद्धाळूंची धार्मिक भावना दुखावलेली आहे व त्याचे प्रसारण केलेले आहे.त्याच्याविरुद्ध तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अमिश देवगण हा नेहमी एक धर्म विशेष च्या धार्मिक भावना दुखावण्यास कारणीभूत असलेल्या कार्यक्रमांचे प्रसारण तो काम करीत असलेल्या आरोपी या दूरचित्रवाहिनी वर करत असतो यापूर्वीही त्याने एक धर्म विशेष च्या एका विशिष्ट वर्गाविषयी उलट सुलट आरोप लावणारे कार्यक्रम आरोपी क्र.2 या दूरचित्रवाणीच्या माध्यमाने केलेली आहे. सदर आरोपी क्र.1व 2 यांच्यावर नमूद प्रकारामुळे एका धर्म विशेष तसेच विश्वविख्यात सुफी संतांचे अपमान करून धार्मिक भावना दुखविलेल्या आहे व त्याचे प्रसारण केलेले आहे. वरील आरोपींच्या या कृत्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
त्यांच्यावर भा. दं. सं च्या कलम 153 (अ ), 153 (ब ),295 (अ ), 298, 505, (2) अन्वय गुन्हा दाखल करण्यात यावा. आरोपी क्र. 1व 2 यांना भविष्यात असे कृत्य करण्यापासून अटकाव करण्यात यावा. याप्रसंगी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला.तसेच याप्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रझा, रऊफ खान, इलियास नुरी, नाझीम कुरेशी इ. उपस्थित होते.








