नवी दिल्ली ;- या महिन्यात एकामागोमाग एक असे तीन लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. यासंदर्भातील वृत्त ग्लोबलन्यूज.कॉमने दिले आहे. या वृत्तानुसार या महिन्यात अंतराळातील अशनी बऱ्याच प्रमाणावर पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत.
सध्या सुरू असलेले २०२० हे वर्ष मानवी जीवनासाठी प्रचंड संकटांचे आणि आव्हानात्मक ठरत आहे. एकीकडे कोरोना, चक्रीवादळ, भूकंप अशा आपत्तींमुळे मानवी जीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालेले असताना आता अजून मोठ्या अस्मानी संकटाने मानवाची चिंता वाढवली आहे .
या महिन्यात एकामागोमाग एक असे तीन लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. यासंदर्भातील वृत्त ग्लोबलन्यूज.कॉमने दिले आहे. या वृत्तानुसार या महिन्यात अंतराळातील अशनी बऱ्याच प्रमाणावर पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. याची सुरुवात ६ जूनपासून होईल. यासंदर्भातील माहिती नासाच्या सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजमध्ये देण्यात आली आहे.
लघु्ग्रह १६३३४८ (२००२ एनएन ४) हा लघुग्रह ०.०५ एयू (७.४८ दशलक्ष किमी) या वेगाने सूर्याच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल. एनईओ क्लोज अॅप्रोच डेटा टेबलनुसार २००२ एनए ४ हा लघुग्रह ६ जून रोजी ३ वाजून २० मिनिटांनी पृथ्वीच्या जवळ येईल.
या लघुग्रहाची लांबी २५०.५० मीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे. तसेच याची रुंदी सुमारे १३५ मीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे. मात्र हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येणार असला तरी त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर पृथ्वी आणि चंद्रापासूनच्या अंतरापेक्षा १३ पट अधिक असण्याची शक्यता आहे.
२००२ एनएच ४ या लघुग्रहाप्रमाणेच २०१३ एक्सए २२ हा लघुग्रह ८ जून रोजी ३ वाजून ४० मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल. २००२ एनएच ४ पेक्षा हा लघुग्रह पृथ्वीच्या अधिक जवळून जाईल. मात्र २००२ एनएच ४ पेक्षा याचा आकार लहान आहे. याची लांबी १६० मीटर तर वेग २४ हजार ०५० किमी प्रतितास एवढा आहे.







