जळगाव– आज संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणा आजारामुळे अति गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना, अशा परिस्थितीमध्ये अडचणीत आलेल्या महाराष्ट्रातील जनतेला मदत करायची सोडून केवळ आणि केवळ राज्यात सत्ता न मिळाल्याच्या रागाने आज राजभवन मुंबई येथे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या टीमने राज्यपालांची भेट घेऊन महा विकास आघाडी सरकार चांगलं काम करत नाही व त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या जिल्ह्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निवेदन दिले.
मदत करायची केंद्राला मात्र फुकटचे सल्ले द्यायचे राज्याला अशी खरमरीत टीका एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे
त्यांनी म्हटले आहे कि , माजी मंत्री गिरीश महाजन व भाजप पदाधिकाऱ्यांनी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फंडात मदत न करता पंतप्रधान फंडांमध्ये मदत केली व इतरही नागरिकांना मदत करण्याचे आव्हान केले. म्हणजेच महाराष्ट्राचे नागरिक असून सुद्धाव महाराष्ट्रातील जनतेने भरघोस मते देऊन 105 आमदार निवडून देऊन सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फंडात केवळ सत्ता नसल्याने मदत न करता भाजपाचे पंतप्रधान असल्यामुळे पंतप्रधान फंडात मदत करण्याची बालिश भावना मनात ठेवून या प्रकारचे कृत्य केले . त्याबद्दल सर्वप्रथम या सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
आता जे महा विकास आघाडीचे सरकार अतिशय जबाबदारीने आपली जबाबदारी पार पाडत कोरोणासारख्या आजाराशी लढा देत, हजारो नागरिकांना कोरोणा मुक्त करत कोरोणाच्या रुग्णांची संख्या वाढू न देता कमी करण्यामध्ये यशस्वी झालेले असताना, देखील अश्या जबाबदार सरकार वरती बिनबुडाचे आरोप करणाऱ्या संपूर्ण भाजप पदाधिकाऱ्यांचा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर निषेध व्यक्त केला.