जळगाव –कुलरमध्ये वीजप्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना येथे घडली असून सुनिता ज्ञानेश्वर कुमावत (वय-३२) रा. हनुमान नगर, असे या महिलेचे नाव आहे .
सुनिता ज्ञानेश्वर कुमावत रात्री १० वाजेच्या सुमारास शौचालयातून बाहेर निघाल्यानंतर विद्यूत प्रवाह उतरलेल्या पत्र्याच्या कुलरला धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर व छातीजवळ विजेचा धक्का लागल्याने ही घटना घडली. सदर विवाहितेस रेणूका (वय-१२) व मुलगा राज (वय-४), आई व दोन भाऊ असा परिवार आहे.