नवी दिल्ली ;– देशात कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता राष्ट्रपती भवनात देखील आता कोरोनाने शिरकाव केला आहे. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आरोग्य मंत्रालयाने 125 कुटुंबाना सेल्फ-आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे.
चितेंची बाब म्हणजे महिलेचा पती राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या अंडर सेक्रेटरी स्तरावरील आयएएस अधिकाऱ्याच्या कार्यालयात काम करत होता. त्यामुळे या अधिकाऱ्याने देखील स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे.