पारोळा ;– नंदुरबार येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तालुक्यातील दोघांना पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथील कोरोना रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
पारोळा येथील एक व सारवे येथील एक असे दोघे नातेवाईक नंदुरबार येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते .
सुदैवाने दोघांना कोरोनाची कोणतीही प्राथमिक लक्षण नसल्याची माहिती डॉक्टर योगेश साळुंखे यांनी दिली .
याचे वृत्त शहरात पसरताच शहरवासीयांमध्ये घबराट निर्माण झाली आहे .