मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं असून, 5 पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. तर, मुंबईतील लोकल सेवाही सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर, आता राज्यातील बससेवाही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली असून जळगाव जिल्ह्यातील सर्व आगारातून बसफेऱ्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली . याबाबतचे आदेश दुपारी प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले . याशिवाय खासगी प्रवासी वाहतूकही रद्द करण्यात आली असून ट्रक टेम्पो यांनाही बंदी करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले .