जळगाव ;- शेतमालकाने कामावरून काढून टाकल्याचा राग मनात ठेऊन दारू पिऊन एका विवाहितेवर दोन भावांनीआळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळ्वालरी रात्री येथे घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. कलशा गंगाराम बारेला व बलशा गंगाराम बारेला (दोन्ही रा. शिरसोली, ता.जळगाव) असे आरोपींचे नाव आहे. मात्र घटना घडल्यानंतर दोन्ही भाऊ पसार झाले आरोपींचा एमआयडीसी पोलीस शोध घेत आहे.

याबाबत सूत्रांनी दिली माहिती अशी कि , शिरसोली शिवारातील मोहाडी रस्त्यावरील ढाके यांच्या शेतात कलशा गंगाराम बारेला व बलशा गंगाराम बारेला हे दोन्ही दारू पिऊन आले . त्यांनी नवरा बायकोशी भांडण आणि मारहाण करण्यास सुरुवात केली . विवाहितेचा पती घाबरून आजूबाजूच्यांना बोलावण्यास गेला असता दोन्ही भावांनी विवाहितेवर आळीपाळीने अत्याचार केला . मात्र घटनेनंतर दोन्ही भाऊ पसार झाले . .दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोघं आरोपींच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना झाली आहेत.
याप्रकरणी बुधवारी पहाटे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलशा व बलशा यांच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







