
मुंबई(वृत्तसंस्था ) ;- : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यातील (Maharashtra Total Corona Cases) अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तरीही कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस आणखी वाढ होत चालली आहे. राज्यात आज (13 जुलै) दिवसभरात तब्बल 6 हजार 497 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 2 लाख 60 हजार 924 वर पोहोचला आहे (Maharashtra Total Corona Cases).
राज्यात दिवसभरात 4 हजार 182 रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात आज दिवसभरात 4 हजार 182 रुग्णांनी कोरानावर मात केली. आतापर्यंत 1 लाख 44 हजार 507 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 1 लाख 05 हजार 637 रुग्णांवर उपचार सुरु आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.38 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
दिवसभरात कोरोनामुळे 193 जणांचा मृत्यू
राज्यात आज दिवसभरात 193 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईतील 47 आणि ठाणे जिल्ह्यातील 28 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या 4.02 टक्के एवढा आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 10 हजार 482 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 13 लाख 42 हजार 792 नमुन्यांपैकी 2 लाख 60 हजार 924 ( 19.43 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 87 हजार 353 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 41 हजार 660 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.







