जळगाव;- कोल्हे हिल्स परिसरात एका ६२ वर्षीय वृद्ध व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकिस आली असून यामुळे खळबळ उडाली आहे .
कोल्हे हिल्स परीसरात राहणारे लक्ष्मण धोंडू सोनवणे वय 62 रा. लक्ष्मीनगर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. हे दोन मुले व पत्नी तसेच नातवंड, सुना या कुटुंबासह वास्तव्यास होते. शनिवारी सकाळी लक्ष्मण सोनवणे हे सकाळी 7 वाजता घरात नसल्याने त्यांचे पत्नी शोभा यांच्या लक्षात आले. त्यांनी मुलगा सागर यास वडिलांचा शोध घेण्यास सांगितले. सागर हा परिसरात वडीलांचा शोध घेत असतांना एका तरुणाने त्याला याच परिसरात जाणता राजा शाळेकडे जाणार्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत एक नागरिकाचा मृतेदह असल्याची माहिती दिली. सागरसह कुटुंबियांनी विहिरीकडे धाव घेतली असता विहिरीत पडलेले व्यक्ती हे लक्ष्मण सोनवणे असल्याचे समोर आले. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, सतीश हाळनोर, उमेश भांडारकर, विलास पाटील, विजय दुसाने यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.. पोलिसांनी याच परिसरातील नागरिक तसेच तरुणाच्या मदतीने मोठा दोर बांधून खाट विहिरीत सोडली. व मृतदेह बाहेर काढला. zयानंतर येथील तरुण विहिरीत उतरला. मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.








