चोपडा;- शहरातील सामाजिक कार्यकर्ते, मशिद पंच व युवकांनी चोपडा तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना दि १६जुन रोजी News 18 च्या संपादक अमिष देवगन यांनी ऎका लाईव्ह चर्चे वेळी भारताचे सुफि संत ख्वाजा गरीब नवाज अजमेर यांना अतिरीकी संत व लुटेरे संत अश्या अशोभनीय भाषेत संबोधुन सर्व धर्मीय अनुयायींचे भावनांचा अनादर केल्याने त्यांच्या विरोधात देशात ठिक ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात येत आहे . याच अनुषांघाने चोपडा तहसिलदार व पि.आय यांना गुन्हा नोंदनी बाबतचा निवेदन देण्यात आले. या निवेदनावर नगरसेवक हुसैनखां पठान,अमजद बापु,मुक्तार सरदार,हाजी आसीफ सैय्यद,नौमान काजी,अकिल जागीरदार,उस्मान भुर्याभाई,जमील कुरैशी,जाकीर सलिम शे.,रईस शेख,मोहसिन भांजा,शहबाज खान,बिलाल शेख, सोनु काजी,कालुभाई मैकानिक,राजु शेख,नामदार खान सह अनेकांची सह्या आहे.








