जळगाव ;- गावाकडे जाणाऱ्या ट्रकचे टायर फुटल्याने एका अनोळखी तरुणाने भाऊ आणि अल्पवयीन १२ वर्षीय मुलीला सोबत घेत अकोला येथे जात असल्याचीबतावणी करून दोघांना ट्रिपलसीट घेऊन जात भावाला पुढे पोलीस असल्याचे सांगून त्याला उतरवून मुलीला घेऊन पोबारा केल्याची घटना १९ रोजी दुपारी घडली होती . याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता . पोलिसांनी चक्रे फिरवून आज १२ वर्षीय मुलगी अमरावती जिल्ह्यातील लोणी येथे आढल्याने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि ,
मुलुंड ( मुंबई ) येथे मजुरीचे काम करणारे कुटूंबीय कोरोना च्या अनुषंगाने आपले मूळ गावी सिसामासा ( अकोला ) येथे जात असताना नशिराबाद ते भुसावळ हायवे क्रमांक ६ वर जेवण करून सावलीत फिर्यादी कडे मोठे वाहन आहे . त्या वाहनाचे टायर फुटले असल्याने दोन तास दुरुस्ती करिता लागणार आहेत म्हणून थांबलेले असताना एक अज्ञात इसम नाव गाव माहित नाही वय अंदाजे ३२ ते ३५ वर्ष अंगात पांढरा रंगाचा शर्ट व मिलिटरी रंगाची पॅन्ट घातलेली , त्याचे मोटर सायकल वर आला व म्हणाला कि मी सुध्दा अकोला येथे जात आहे तु व तुझी बहीण मोटर सायकल वर बस असे सांगून त्यांना भाऊ वय १९ व बहीण १२ वर्ष यांना मोटर सायकल वर बसून नेट असतांना दुपारी १५:४५ वाजेच्या सुमारास नशिराबाद ते भुसावळ हायवे क्रमांक ६ वर डॉ . उल्हास पाटील मेडिकल कॉलेज चे पुढे त्याने मोटर सायकल थांबवुन पुढे पोलिसांची गाडी असल्याने त्याने मोटर सायकल वरील तिसरे शीट १९ वर्षीय भाऊ यास उतरुन तु पुढे चालत ये असे सांगून माझी बहीण त्याचे गाडीवर बसलेली असतांना तो सरळ निघून गेल्याने त्याचे विरुद्ध नशिराबाद पोलीस स्टेशन भाग – ५ गुरन.१४७/२०२० भादवि.क.३६३ दाखल करण्यात आला होता .
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ . पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके यांनी गुन्हा दाखल झाले बरोबर सर्व पोलिस यंत्रणा तत्काळ राबवून भुसावळ ते अकोला पावेतो तात्काळ नाकाबंदी लावून पथके रवाना केले होते .
दरम्यात आज सकाळी अमरावती ग्रामीण चे लोणी पोलीस स्टेशन चे हद्दीत सुखरूप मिळून आलेली आहे .