पारोळा : तालुक्यातील भोकरबारी येथील एका ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक २२ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
संदीप प्रकाश बडगुजर ३५ यांनी दिनांक २२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांचे भोकरबारी येथील राहते घरातील स्लॅबच्या बंगडीच्या कडीला लेडीज रुमालने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत गावातील विनोद गंगाराम पाटील यांनी पाहिल्यानंतर त्यांनी उपसरपंच भानसिंग राजपूत यांना कळविले त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर भानसिंग पाटील, गणसिंग संतोष पाटील,राहुल तुकाराम पाटील, भास्कर पोपट पाटील, अशांनी मयतास उतरून ईश्वर ठाकूर यांच्या रुग्णवाहिकेतुन कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर योगेश साळुंखे यांनी तपासून मयत असल्याचे घोषित केले. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात भानसिंग राजपूत उपसरपंच भोकरबारी यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे.कॉ. प्रकाश चौधरी करीत आहेत मयत त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे.