अमळनेर;- तालुक्यातील बहादरवाडी गावातील अमोल पाटील याने फोन द्वारे मला कोरोना झाल्याची अफवा पसरवून भीती निर्माण करीत असल्याने अमळनेर चे कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार मिलिंद वाघ व पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी पोलिसी भाषेत प्रसाद देऊन समज दिली.
सविस्तर माहिती अशी की, बहाद्दरवाडी येथील रहिवासी असलेला मात्र पुणे येथून आलेला युवक अमोल पाटील याने सामाजिक कार्यकर्ते आशिष चौधरी यांना भ्रमण ध्वनी वरून मला कोरोना ची लागण झाली आहे अशी माहिती दिली. त्यामुळे
संबंधित घटनेची माहिती अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना दिली असता त्यांनी ताबडतोब बहादरवाडी येथे 108 एबुलन्स पाठवून आशा वर्कर्स देखील सदर युवकास तपासणी साठी पाठविल्या.परंतु नंतर मात्र सदर अमोल पाटील या युवकाने मी प्रशासनाची मजा घेत होतो मला काही झालेले नाही असे प्रशासकीय कर्मचारी आणि आशिष चौधरी यांना भ्रमण ध्वनी वरून सांगितले.
या अनुषंगाने तहसीलदार मिलिंद वाघ आणि पोलीस निरीक्षक अंबादास मोरे हे स्वतः बहादरवाडी येथे गेले आणि सदर युवकास प्रशासनाचा चांगलाच हिसका दाखवत गावातही हा संदेश दिला की जर कोरोना च्या अत्यन्त बिकट परिस्थितीत कोणी प्रशासनाची दिशाभूल करीत असेल व अफ़वा पसरवीत असल्यास त्याच्या वर कडक कार्यवाही करण्यात येईल, अशी सूचना दिली.