पाचोरा -( प्रतिनिधी) – येथील अॅक्सिस बँकेच्या खात्यातून ग्राहकाच्या ओटीपी नंबरव्दारे ९८ हजार ७०१ रूपयांची रक्कम परस्पर खात्यातून हटविल्याने एका अज्ञात विरूध्द पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पंकज केशवराव पाटील रा. शास्त्री नगर, चाळीसगाव हे येथे आदर्श शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. येथील अॅक्सिस बँकेत पगाराचे खाते आहे. या खात्याचे नवीन क्रेडिट कार्ड घेतले त्याच दिवशी दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञात इसमाने मोबाईल नंबरवरून काॅल करून पंकज पाटील यांना त्यांच्या मोबाईलमध्ये ओटीपी काय आला आहे, असे विचारले असता पंकज पाटील यांनी फोनवरून ओटीपी नंबर सांगितला. त्यांचा गैरवापर करून सदर व्यक्तीने पंकज पाटील यांच्या खात्यातून परस्पर ९८ हजार ७०१ रूपयांची खरेदी करीत फसवणूक केली. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गु. र. नं. ६७/२०२० भादवि कलम ४२० प्रमाणे चागुन्हा दाखल करण्यात आला आहे