जळगाव ;-डिझेल संपल्याने अचानक कारने अचानक पेट घेतल्याने आणि जवळच असलेल्या अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणून ती विझविल्याने पुढील अनर्थ टळल्याची घटना आज काव्यरत्नावली चौकात भर दुपारी घडली . यावेळी अनेकांची एकच धावपळ उडाली .
शहरातील काव्यरत्नावली चौकात अचानक कार (क्रं.एमएच-१७ एजे ३०६९) बंद पडली होती. कार चालक योगेश शिंदे यांनी बंद पडलेली कार सुरू करण्याच्या प्रयत्न असतांना कारने अचानक पेट घेतला. कारने आग घेतल्याने तरूणाने तत्काळ कारच्या खाली उतरवून अग्नीशमन बंबाशी संपर्क साधला. महाबळ येथील भाऊंचे उद्यानजवळ असलेल्या अग्निशामक बंबांच्या कर्मचारयांनी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.