मुंबई(वृत्तसंस्था) ;- कोरोनाच्या प्रादुर्भावानं देशभरात कळस गाठलेला असताना एक आशादायी बातमी समोर आलीय. ती म्हणजे झायडस कॅडिला (Zydus Cadilla) हेल्थकेअरच्या एका औषधाला भारताच्या औषध नियामक मंडळाने मान्यता दिली आहे.

Drug Controller General of India अर्थात DCGI ने झायडस कॅडिलाच्या विराफिन (Virafin) या औषधीला कोरोनाचा सौम्य संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी वापर करण्यास मान्यता दिली आहे. या औषधीचं संपूर्ण नाव Pegylated Interferon alpha-2b किंवा PegIFN असं आहे.
हे आपत्कालीन परवानगी (Emergency Approval) असून, ते मर्यादित प्रमाणात वापरता येईल, असंही DCGI ने सांगितलंय.
कंपनीने DCGI ला दिलेल्या अर्जात म्हटलं होतं की, ‘या औषधामुळे रुग्ण लवकर बरे होत असून, त्यांच्या उपाचारातला गुंताही यामुळे कमी करता येतो.’







