जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटना (सिटू ) तर्फे आज दुपारी आंबेडकर मार्केट कामगार आयुक्त कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन निदर्शने करण्यात आली .

यावेळी कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . निवेदनात म्हटले आहे कि, जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना २०१७ पासून कल्याणकारी मंडळांच्या योजनांचे लाभ मिळत नसून शिष्यवृत्ती, आरोग्य,प्रसूती अनुदान, विवाह अनुदान, कोविड १९ अनुदान, आदी विविध मागण्यांचा लाभ मिळालेला नाही . तो मिळावा यासाठी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले . यावेळी कॉ . विजय पाटील, कॉ. प्रवीण चौधरी, विनोद आढाळके रज्जाक मिस्त्री , हनीफ मिस्त्री , साबीर मिस्त्री , साबीर शेख आदी उपस्थित होते.







