अमळनेर ;- शहरातील तांडेपुरा भागात अवैध दारू विक्री आणि झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात अली असून त्यांना अटक करण्यात आली आहे . आज रोजी दि.१० ताडेपुरा भागात जुगार झानमना खाली तसेच अवैध दारू असा गुन्हा नंबर ४६३ महाराष्ट्र जुगार अधिनियम खाली कलम १२ अ महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम खाली ६५ ई खाली गुन्हा दाखल करण्यात आला. यात रोख रक्कम ६०२१०/- व ५० लिटर ब देशी व विदेशी दारू मिळून आले.
पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले , अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांचे पथक सपोनी प्रकाश सदगिर, पोउपनि गणेश सूर्यवंशी, पोना डॉ.शरद पाटील, पोना दिपक माळी, रवी पाटील, हितेश चिंचोरे, योगेश महाजन तसेच आरसीपी चे जवान अशांनी कारवाई केली. मनोज रावण संदांशिव राहुल सुभाष महाजन , अविनाश माचरे , मनिष महेंद्र महाजन , गोविंदा वैदू , उमेश राजू धाप , चेतन चव्हाण आदींना अटक करण्यात आली आहे.