नवी दिल्ली – नागरिकत्व कायद्याला समर्थन आणि विरोध करताना दिल्ली हिंसाचारामुळे धुमसली आहे. यादरम्यान जाफराबादमध्ये दिवसाढवळ्या पोलिसांवर पिस्तूल रोखणारा शाहरुख नामक तरुण क्राईम ब्रांचने अटक केली आहे.
माहितीनुसार, २४ फेब्रुवारी रोजी जाफराबादमध्ये मौजेपुर चौकात शाहरुखने पोलिसांसमोर सात वेळा गोळीबार केला होता. त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना बंदोबस्तात असलेले हवालदार दीपक दहिया यांच्यावरच आरोपीने पिस्तूल रोखली. यानंतर शाहरुख फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलीस आटोकाट प्रयत्न करीत होते. अखेर शाहरुखला पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिल्ली हिंसाचाराच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. चौकशीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला शिव विहारच्या जवळील गोविंद विहार भागात एक अवैध ऍसिडची फॅक्टरी आढळून आली आहे. दिल्लीत मोठा विध्वंस करण्याच्या हेतूनेच हा साठा करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.