जळगाव (प्रतिनिधी)- चांगल्या पोलीस ठाण्यात, मोठ्या पदावर बदली व्हावी यासाठी लागणारे 15 लाख रुपये माहेरुन आणावे म्हणून पोलीस अधिकार्यानेच पत्नीचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पत्नीचे 22 तोळ्याचे सोनेही हिसकावून घेतले आहे. किशोर नारखेडे असे या पोलीस अधिकार्याचे नाव असून अकोला जिल्ह्यातील डाबकी पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक पदावर कार्यरत आहे. रविवारी त्यांच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक येथील सिडको चाणक्य नगरात रहिवासी योगिता यांचे 2011 मध्ये अमळनेर येथील किशोर वानखेडे यांच्यासोबत लग्न झाले. लग्नाच्या वेळी योगिता हिच्या कुटुंबियांनी 8 लाख 25 हजार रुपये हुंडा व लग्न असा एकूण 15 लाख रुपयांचा खर्च केला. लग्नानंतर पतीची पहिली नेमणूक पुणे येथे झाली. त्यानंतर नाशिक, बुलढाणा याठिकाणी बदली झाली. दरम्यानच्या काळात योगीता यांना एक मुलगी व मुलगा झाला. मुलगी एंजल ही 7 वर्षाची व मुलगा प्रिन्स 3 वर्षाचा आहे.
पोलीस ठाण्यात त्रास होत असल्याने पती किशोर हे योगीता यांना तु माझ्यासाठी काही पण कर मला त्रास होवु नये यासांठी काही तरी कर व ऐकले नाही तर मारहाण व शिवीगाळ करायचे. 22 जुलै 2019 रोजी पार्किंगमध्ये असलेली गाडी काढण्यासाठी घरमालकाला सांगिल्याचा राग आल्याने पती वानखेडे यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर पुन्हा बदलीसाठी माहेरुन 15 लाख रुपये घेवून ये यासाठी मारहाण व शिवीगाळ करायचे. या त्रासाला कंटाळून योगीता या आजी व दोन्ही मुलांसह जळगावात विभक्त राहत आहेत. वेगळे निघाल्यावर पतीने योगीता हिचे 22 तोळे सोन्याचे दागिनेही काढून घेतले. तुला सोने देणार नाही, तुला जे करायचे ते कर अशी धमकी दिली होती. या मानसिक तसेच शारिरीक त्रासाला कंटाळून विवाहितेने रविवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावर किशोर वानखडे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे .