• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्पेनने चीनलाही टाकले मागे ;२४ तासांत कोरोनाचे सुमारे अडीच हजार बळी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 25, 2020
in भारत, विश्व
0

 

जगभरात कोरोनाचा कहर आणखी वाढला आहे.

लंडन (वृत्तसंस्था ) : जगभरात कोरोनाचा कहर आणखी वाढला आहे. जगभरात मृतांचा आकडा १९ हजारावर गेला आहे. जगभरातल्या मृतांची संख्या १९१०१ इतकी झाली आहे. २४ तासांत इटलीत ७४३ तर स्पेनमध्ये ६८० रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही संख्या दर तासाला वाढतच आहे. इटलीपाठोपाठ स्पेनमध्येही चीनपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. आतापर्यंत स्पेनमध्ये कोरोनामुळे ३४३४ जणांचा बळी गेला आहे. तर अमेरिकेत गेले दोन दिवस प्रतिदिन १०० हून अधिक बळी गेले होते. पण मंगळवारी एकाच दिवशी अमेरिकेत २२५ बळी गेले.

जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. तब्बल १९७ देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. २४ तासांत त्यात ५० हजार नवे रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे १ लाख ९ हजार रुग्ण बरे झाले आहेत.

इटली, स्पेन, अमेरिकेत मृतांची संख्या वाढली

इटलीमध्ये कोरोनाचा कहर थांबायचं नाव घेत नाही. इटलीत दररोज ६७२ च्या सरासरीनं गेल्या पाच दिवसांत ३३६५ रुग्णांचा मृत्यू झालाय. तर १० दिवसांत ५३२९ रुग्णांचा मृत्यू झालाय.

स्पेनमध्ये कोरोनाचं संकट इटलीप्रमाणेच आणखी जोर धरू लागलं आहे. स्पेनमध्ये मृतांची संख्या तीन हजारांच्या जवळ पोहचली असून एक-दोन दिवसांत स्पेन चीनलाही मागे टाकेल अशी शक्यता आहे. २४ तासांत स्पेनमध्ये ६८० रुग्णांचा बळी गेला आणि मृतांची संख्या २९९१ वर पोहचली. स्पेनमध्ये गेला आठवडा भर प्रतिदिन मृतांची संख्या १०० पेक्षा जास्त असून अवघ्या ५ दिवसांत २१६० बळी गेलेत.

फ्रान्समध्ये बळींची संख्या ११००

फ्रान्समध्ये कोरोनाच्या बळींची संख्या ११०० झाली आहे. फ्रान्समध्ये सलग चार दिवस १०० हून अधिक बळी जात असून २४ तासांत तिथं २४० बळी गेलेत. फ्रान्समधील मृतांचा आकडा हा केवळ रुग्णांतलांतील असून प्रत्यक्षात यापेक्षा अधिक मृत्यू झाले असावेत, असं हॉस्पिटलच्या प्रमुखांनी म्हटलंय. घरी आणि वृद्धाश्रमात झालेल्या मृत्युंची आताच्या आकडेवारीत नोंद नाही, अशी माहिती त्यांनी दिलीय.

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे तशी मृतांचीही संख्या वाढत आहे. अमेरिकेत आठवडाभरात सुमारे ५० हजार रुग्ण वाढले. तर मृतांचा आकडा ७८४ वर पोहचला. २४ तासांत अमेरिकेत २२५ जणांचा मृत्यू झाला.

ब्रिटनमध्ये ८७ जणांचा कोरोनानं मृत्यू

ब्रिटनमध्येही मंगळवारी ८७ जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. तिथं मृतांची संख्या ४२२ वर पोहचली आहे. तर चीनमध्ये मात्र कोरोना आटोक्यात आला असून मंगळवारी केवळ ४ जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये कोरोना बळींची संख्या ३२८१ इतकी आहे.

इराणमध्ये सलग १० दिवस १०० हून अधिक बळी गेले आहेत. मंगळवारी १२२ जणांचा मृत्यू झाला आणि इराणमध्ये कोरोना बळींची संख्या दोन हजाराचा आकडा पार करून २०७७ इतकी झाली.

कोरोनाच्या संकटानं जगभरातल्या प्रमुख नेत्यांना ग्रासलं असून सात देशांत मृतांची संख्या तीन अंकी आहे तर पाच देशांत कोरोना बळींची संख्या चार अंकी आहे.


 

 

Previous Post

कोरोना : भारताकडून पहिल्यांदाच मेक इन इंडिया टेस्ट किट तयार

Next Post

कोरोनाच्या पार्शवभूमीवर पारले आली धावून ; ३ कोटी बिस्कीट पुड्यांचे करणार वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाच्या पार्शवभूमीवर पारले आली धावून ; ३ कोटी बिस्कीट पुड्यांचे करणार वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon