धरणगाव येथील घटना
जळगाव ;– धरणगाव येथे दुपारी घरात झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर अचानक भिंत कोसळल्याने यात ४० वर्षीय इसम गंभीर जखमी होऊन त्याला दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा वाटेतच मृत्यू झाल्याची घटना आज येथे घडली .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , मनोहर प्रल्हाद पाटील (वय-40,रा.धरणगाव,मराठे गल्ली) आज दुपारी 2 वाजता राहत्या घरात झोपलेले असतांना अचानक घराची भिंत अंगावर पडल्याने आजुबाजूच्या घरातील लोकांनी मनोहरला बाहेर काढून धरणगाव ग्रामीण रूग्णालयात नेले असता, यावेळी ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांनी तात्काळ मनोहरला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. यावेळी येत असतांना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, वडील, तीन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. सदर मनोहर पाटील हा कापसाच्या गाडीवर मजुरी काम करायचा. अचानक झालेल्या या घटनेमुळे त्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.