भडगावः- जळगाव जिल्हा नाभिक समाजध्यक्ष नानासाहेब शिरसाठ यांची औरंगाबाद येथिल राज्यस्तरीय मेळाव्यात उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हातील नाभिक समाजाने स्वागत केले आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळचा राज्यस्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा औरंगाबाद येथिल मौलाना आझाद संशोधन केद्राच्या सभागृहात संपन्न झाला. मेळाव्यात नाभिक महामंडळ राज्यध्यक्ष कल्याणराव दळे यांनी नाभिक महामंडळाच्या पदाधिकारीच्या विविध नियुक्ती जाहीर केल्या. यात भडगाव येथिल रहिवाशी तथा नाभिक समाज जळगाव जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिरसाठ यांच्या कडे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर या जिल्हाची जबाबदारी सोपवत उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती जाहीर केली. नानासाहेब शिरसाठ यांनी जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणुन जबाबदारी पारपाडताना जिल्ह्यात गुणवंत पाल्याचा सन्मान, वर-वधु परीचय मेळावे, प्रबोधन मेळावा असे विविध उपक्रम राबविले. तसेच समाजातील गट-तट बाजुला सारुन समाज एकत्रितपणे कसा संघटीत राहील यासाठी सतत प्रयत्नशिल आहेत. या कार्याची दखल घेवुन राज्यध्यक्ष कल्याणराव दळे यांनी त्याची उत्तर महाराष्ट्र विभागिय अध्यक्ष पदी निवड केली. या निवडीने नानासाहेब शिरसाठ यांच्या कर्तृत्व व नेतृत्वावर शिक्का मोर्तब केले असुन या निवडीचे जिल्हातील नाभिक समाज पदाधिकारी व समाज बांधव यांनी स्वागत केले.