जळगाव ;- व्यवसायासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी शहरातील वाघ नगर येथील विवाहितेचा छळ करणाऱ्या पती विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील वाघ नगर येथील माहेर असलेल्या पुजा उमेश दुसाने (वय-२५) यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील तऱ्हाडी ता. शिरपूर येथील उमेश सोमनाथ दुसाने यांच्याशी एप्रिल २०१४ मध्ये विवाह झाला आहे. सुरूवातीचे सहा महिने चांगले गेले. हुंडा कमी दिला म्हणून माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. पैश्यांची मागणी पुर्ण न झाल्याने पती उमेश दुसाने याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. हा शारिरीक व मानसिक छळ सहन न झाल्याने विवाहिता जळगावला माहेरी ६ फेब्रुवारी २०२१ रोजी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात पती उमेश दुसाने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल मोरे करीत आहे.








