पाचोरा (वार्ताहार)- वरखेडी गावाच्या मुख्य रस्ताने व बाजार पेठेतील शनेश्वर चौकातील नाल्यात घाणीचे साम्राज्य असल्याचे चित्र दिसत असून संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे .
याबाबत सविस्तर वृत असे की वरखेडी या गावी मुख्य अशा बाजार पेठेतून व्हणार्या मोठ्या नाला श्री शनेश्वर मंदीरा जवळ दुरगंधी युक्त पाणी व घाणी चे साम्राज्य सून ही घाण वरखेडी ग्रा प अपूर्ण नाला कोरल्याने वाहून आली व तिला न उचलता नाल्यातच सोडून देण्यात आली . तर पाचोरा जामनेर रस्ता लागून वस्तीच्या बाजूला उकिरडे व घाण येद्या पाणी साचले आहे. वरखेडी भोकरी गावच्या सिमेरेषे वरती भोकरी ग्रा प हाकेच्या अंतरावर उकिरडेच उकिरडे आहे . भोकरी ग्रा प वाले म्हणतात वरखेडी ग्रा प काडेल तर वरखेडी ग्रा प म्हणते की भोकरी ग्रा.प कडतील तर ही घाण कोणी काढवी ही घाण गुरुवारी भरणाऱ्या बाजारातील सडलेली फळे व उरलेला भाजीपाले चे असून दोन्ही ग्रामपंचायती च्या सिमेरेषे वर आहे म्हणून ही घाण उचलायची तरि कोणी ? असा प्रश्न आहे . तर पिंपळगाव वरखेडी रस्तावर बाहुळा नदीच्या काठावर्ती विसावा चौक जवळ ही घाणी चे साम्राज्य आहे गावातील गटारी तुडुंब भरल्या असून ग्राम सफाई चे पूर्णता हा बारा वाजले सून याबाबत ग्रामस्थांनी वेळेवळी तोंडी लेखी निवेदनदेऊन देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. गावातील कचरा गावा बाहेर दूर नटाकता जवळच टाकण्यात येते. याकडे जि.प. जळगाव चे सी ई ओ मननीय जिल्हा आधिकारी जळगाव पाचोरा प.स. चे गटविकास आधिकारी व लोकप्रतिंनिधी आमदार जि.प सदस्य प .स. सदस्य यांनी लक्ष घालून ही घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी प्रयत्न करावे अशी ग्रामस्थांची मागणी असून या घाणी पासून सथीचे रोग पासरणाची भीती आहे . कोरोंना विषाणू बाबत सर्व शासकीय यंत्रणा आलर्ट होत असून विविध प्रतिमाबंधक उपाय योजना गती दिली जात आहे असे आसले तरी वरखेडी भोकरी च्या ग्रामपचायत कडून गावात धुरळ फवर्णी नाही चौकाचौकात घाणीचे साम्राज्य असल्याचे चित्र दिसून येत आहे .