जळगाव ;- सध्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच अनेकांना आर्थिक लाभ शासन देत असले तरी वाहन खरेदी विक्री व्यवसाय करणारे , एजंट तसेच यावर अवलंबून असणारे कर्मचारी आदींचा पगार काढणे कठीण झाले असून त्यांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत सापडले आहेत . या अनुषन्गाने भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष हितेश पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्योग मंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील परिवहन मंत्री अनिल परब आदींना निवेदनाद्वारे केली होती . लवकरच यावर तातडीने उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे .