अमळनेर;;- येथील शिरीष चौधरी मित्र परिवाराचे नगरसेवक तथा न पा गट नेते बबलू पाठक यांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही .
सविस्तर वृतांत असे की, शहरात काल रात्री मृदुला प्रवीण पाठक ( वय 17 ) या युवतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मृदुला ही अमळनेर नगर परिषदेचे गट नेते प्रवीण पाठक यांची मुलगी होती. आत्महत्या केली असल्याचे समजताच मृदुला हिला खाली उतरवून अमळनेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथून त्यांनी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता तिला मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.एम. पाटील यांनी आत्महत्या केली असल्याचे संगीतले आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप कळु शकले नाही. दरम्यान या बाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करीत आहेत.
मयत मृदुला ही एक सुसंस्कारित मुलगी होती. ती सदैव हसतमुख असायची. ती चांगली लॉन्स टेनिस खेळाडू होती. तिच्या अश्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.