जळगाव ( प्रतिनिधी ) ;- भुसावळचे आ. संजय सावकारे गाडी क्रमांक ०२१०५ अप विदर्भ गोंदिया एक्सप्रेस एसी एक बर्थ क्रमांक -३९ वरून प्रवास करीत असताना एका तरुणाने मोबाईल चेक करायची बतावणी करून आ. सावकारे यांचा ९० हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविल्याची घटना घडली . त्यांनी चोरट्याचा पाठलाग केला मात्र तो सापडला नाही .
आ. सावकारे यांनी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी याबाबत तपास यंत्रणा फिरवली. रेल्वे रुळावर असलेल्या एका तृतीय पंथीयाकडे आमदाराचा मोबाईल आढळला.








