पाचोरा ;- येथील संकल्प प्रतिष्ठान या सोशल मीडिया ग्रुपवर एकाने कोरोना आजाराबाबत अपप्रचार केल्याविरुद्ध आणि दुसर्याने तो एका ग्रुपवर प्रसारित केल्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची माहिती अशी कि , संकल्प प्रतिष्ठान या व्हाटसप ग्रुपवर प्रवीण बच्छाव रा. संत गाडगेबाबा नगर ९४२०४००३८३९ या मोबाईलद्वारे यांनी इंग्रजीतून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे अशी अपप्रचार करणारी पोस्ट दुपारी ४ वाजून २७ मिनिटांनी व्हायरल केल्या प्रकरणी कोरोना जनता कर्फ्युमध्ये तैनात असणारे पोना सुनील पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादीत म्हटले आहे कि , पोस्ट व्हायरल करताना वैदद्यकीय अधिकारी कडून खात्री न करता प्रवीण बच्छाव आणि आरोपी दत्तू वेळचंद पाटील वय ३० रा. जरगाव ता. पाचोरा यांनी एमएच १९ ९७४० या ग्रुपवर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.