भडगाव (प्रतिनिधी) : आ. किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून भडगाव येथील महावितरण कार्यालयावर ताला-ठोको व हल्लाबोल आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाच्या आधी आमदारांनी कार्यकर्त्यांना उत्साहित व संतप्त अशी चिथावणीखोर वक्तव्य केले. त्यामुळे भडगाव येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांचेसह कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीत वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भडगावात आमदारांच्या नाटकी आंदोलनाने महावितरणाच्या निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी घेतला असा गंभीर आरोप यावेळी भाजपाचे अमोल शिंदे यांनी केला.
तसेच अशा पद्धतीने महावितरण कार्यालयात जबरी प्रवेश करून अभियंता व वायरमन यांना बेकायदा मारहाण करणाऱ्या व त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या समाजविघातक प्रकृतीचा शोध घेऊन आमदारांसह संशयितांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मृत कर्मचारी गजानन राणे यांच्या कुटुंबाला शासनस्तरावरून तात्काळ 50 लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय सेवेत तात्काळ सामावून घ्यावे अशी मागणी आम्ही शासन दरबारी लावून धरणार आहोत असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.
निवेदन देताना भडगाव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, सरचिटणीस गोविंद शेलार, भुषण देवरे, संजय पाटील, दिपक माने आदी पदाधिरकार्यांनी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना निवेदन देण्यात आले.