‘मविआ’चे जयश्री महाजन ८७ हजार ५०३ मतांनी पराभूत
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- येथील जळगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा तथा सुरेश दामू भोळे यांचा सलग तिसऱ्यांदा विजय झाला असून महाविकास आघाडीचे माजी महापौर जयश्री सुनील महाजन यांचा ८७ हजार ५०३ हजार मतांनी पराभव केला आहे. आता आ. सुरेश भोळे यांच्या नेतृत्वावर जळगावकरांनी विश्वास ठेऊन सलग तिसऱ्यांदा त्यांना विधानसभेत पाठविले आहे.
आता सर्व १९ फेऱ्या संपलेल्या आहे. आ. भोळे यांना १९ व्या फेरीअखेर १ लाख ५१ हजार ५३६ तर जयश्री महाजन यांना ६४ हजार ३३ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष डॉ. अश्विन सोनवणे यांनी ६९२० मते मिळवून लक्ष वेधून घेतले आहे. जळगाव शहरातील विविध भागात महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे ललितकुमार घोगले यांना ४ हजार १९१ तर अपक्ष कुलभूषण पाटील यांना ३ हजार ३५ मते मिळाली आहे. यावल येथील अपक्ष उमेदवार जयश्री सुनील महाजन यांना २ हजार ९३ मते मिळाली आहे. मनसेचे डॉ. अनुज पाटील यांना १४७० मते, माजी नगरसेवक मयूर कापसे याला ८९४ मते तर बसपाच्या शैलजा सुरवाडे यांना ८५४ मते मिळाली आहे.