चौकाचौकात जल्लोष सुरु
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- येथील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. मंगेश चव्हाण यांनी जवळजवळ विजय निश्चित केला आहे. महाविकास आघाडीचे उन्मेष पाटील हे जवळपास ७० हजारानी पिछाडीवर दिसून येत आहे.
आता जवळपास १९फेऱ्या संपलेल्या असून चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. चाळीसगावात आता चित्र स्पष्ट झाल्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शुकशुकाट दिसून येत आहे.