रावेर (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील हत्याकांडातील मुलीवर शारिरीक अत्याचार केल्याचे उघडकीस आले असून हे प्रकरण युपीतील हाथरस येथील प्रकरणापेक्षाही भयंकर असल्याचा आरोप माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला आहे. बोरखेडा येथील पिडीत कुटुंबाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी आज दुपारी बोरखेडा येथे भेट दिली. त्यांच्या सोबत खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील, माजी उपाध्यक्ष नंदू महाजन आदी मान्यवर होते. आ. महाजन यांनी पिडीत कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी ते म्हणाले की, अगदी रस्त्याला लागून असणार्या घरात झालेले हे हत्याकांड अतिशय दुर्दैवी असून यातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांना कठोर दंड करण्याची मागणी आ. महाजन यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, या प्रकरणात आम्ही काहीही राजकारण आणत नाही. तथापि, हाथरस प्रकरणापेक्षाही हे भयंकर प्रकरण असून याची कसून चौकशी करण्याची मागणी गिरीश महाजन यांनी केली.