पहूर ता.जामनेर ;- केवळ व्हाट्सअप , फेसबूकवर शुभेच्छा संदेश पाठवून वाढदिवस साजरे न करता वाढदिवस करायचेच असल्यास वृक्षारोपण करून वाढदिवस साजरे करा असे प्रतिपादन शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शरद बेलपत्रे यांनी केले . पाश्चात्त्य संस्कृती नूसार नूसतेच केक कापून व नृत्य करीत धांगडधिंगा न करता वृक्षारोपण , रक्तदान यासारखे राष्ट्रीय उपक्रम राबवून वाढदिवस साजरे केले पाहीजे. यापूढे संघटनेचे सदस्य व मित्रांचे वाढदिवस किमान पाच झाडे लावूनच साजरे करूया असेही ते म्हणाले.पहूर शहर पत्रकार संघटनेच्या सदस्यांनी जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शरद बेलपत्रे यांचा वाढदिवस रक्तदान दिनाच्या पूर्वसंधेला वृक्षारोपण करून साजरा केला. सरपंचपती रामेश्वार पाटील , उप सरपंच शाम सावळे ,कोरोना विरूद्ध लढाई लढणारे ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी कोरोना योध्देडॉ. पूष्कराज नारखेडे डॉ. संदीप कुमावत , डॉ. जितेंद्र वानखेडे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पांढरे , उपाध्यक्ष रवींद्र घोलप यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे सदस्य मनोज जोशी , रविंद्र लाठे , डॉ.संभाजी क्षिरसागर , सादिक शेख , संजय पाटील यांचेसह सांबा विभागाचे चौधरी , शिक्षक बी बी पाटील ,अशोक सुरवाडे, ज्ञानेश्वर पवार ,विजय माहोरे ,सुहास बेलपत्रे ,विशाल जाधव , सौरभ बेलपत्रे ,गणू पाटील उपस्थित होते.