पारोळा (प्रतिनिधी) – अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप खंडापुरकर यांच्या आदेशाने जळगाव महिला जिल्हाध्यक्षपदी चहुत्रे येथील शोभा पाटील यांची व सुलोचना महाजन यांची पारोळा महिला तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पारोळा येथे जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची बैठक घेण्यात आली.संस्थापक अध्यक्ष प्रदीप खंडापुरकर यांच्या आदेशाने महिला जिल्हाध्यक्षपदी शोभा पाटील तर पारोळा तालुका महिला तालुकाध्यक्षपदी सुलोचना महाजन , पारोळा महिला शहराध्यक्ष म्हणून विजया पाटील आणि उपतालुकाध्यक्ष म्हणून संगीता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अत्याचार आणि सरकारी कामात भ्रष्टाचार रोखण्यासाठी संघटने विस्तार आवश्यक असून त्यासाठी जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात महिलांची पूर्ण टीम नियुक्ती करणार असल्याचे शोभा पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेश पाटील , विभागीय अध्यक्ष जितेंद्र वानखेडे यांच्यासह विभागीय संघटक अरविंद जाधव , विनोद पाटील , स्वाती शिंदे, भाऊसाहेब सोनवने , शाम जाधव , सचिन खेडेकर ,मनोहर केदार, संगीता लोणारी उपस्थित होते.