चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांची प्रतिक्रिया
जळगाव ( प्रतिनिधी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडला. हा अर्थसंकल्प क्रांतिकारक अशा स्वरूपाचा आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख वाढवून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करणे असो की, १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन केंद्राने मध्यमवर्गी्यांना खूप मोठा दिलासा देणे असो, धडाकेबाज व ऐतिहासिक निर्णय घेऊन विकसित भारताच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल टाकले आहे, अशी प्रतिक्रिया चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
वैद्यकीय सुविधा, पायाभूत सुविधांचे प्रकल्प, संरक्षण, शिक्षण अशा विविध क्षेत्रासाठी करण्यात आलेली तरतूद भारताला प्रगतीची नवी दारे उघडून देणारी आहे.
महिला, शेतकरी आणि युवकांसाठी नव्या संधी देणारा हा अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे. भारतातील मध्यमवर्गीय आणि गरीबांसाठी सरकारने केलेले आर्थिक नियोजन खूप प्रशंसनीय आहे, अशी प्रतिक्रिया आ. मंगेश रमेश चव्हाण यांनी दिली आहे.