नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – काँग्रेस महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक विवाहबंधनात अडकले आहेत. वयाची साठी पार केल्यानंतर वासनिक यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. रवीना खुराना यांच्याशी मुकुल वासनिक यांनी लग्न केलंय.
दिल्लीतील आलिशान ‘मौर्या शेरेटॉन हॉटेल’मध्ये मुकुल वासनिक यांचा विवाहसोहळा पार पडला. वासनिक यांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी, तसेच काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा छोटेखानी समारंभ पार पडला.
काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक गहलोत, मनिष तिवारी, अहमद पटेल, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांच्या ट्वीटमुळेच मुकुल वासनिक यांच्या विवाहाची सुखद बातमी सर्वांना मिळाली.दरम्यान, अशोक गेहलोत, मनिष तिवारी यांनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.