पाचदेवी माता मंदिर येथे भावपूर्ण वातावरणात शिक्षकांनी केले कौतुक
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या सन १९९८-९९ बॅचचे माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शिरसोली परिसरातील पाचदेवी माता मंदिर येथे स्नेहमेळावा रविवारी प्रजासत्ताक दिनी दि. २६ जानेवारी रोजी घेतला. “इतनी शक्ती हमे दे ना दाता” या प्रार्थनेने स्नेहमेळाव्याला सुरुवात झाली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या.
कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. माजी मुख्याध्यापक एल. एच. बारी, माजी पर्यवेक्षक पी. टी. बारी, एस. पी. पाटील, विद्यमान शिक्षक ए. टी. बावस्कर, श्रीमती वैष्णव मॅडम यांचा विद्यार्थ्यांनी सन्मान केला. नंतर विविध खेळ व विविध पारंपरिक गीतांवर ठेका धरून विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्यात उत्साह आणला. यावेळी महिला विद्यार्थिनींनी एकत्र येत हळदी-कुंकूचा कार्यक्रम केला. प्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
नंतर सुग्रास वरण-बट्टी, वांग्याची भाजी या पारंपरिक भोजनाचे सेवन केले. स्नेहभोजन आटोपल्यावर आठवणी कायम ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रुप फोटो घेऊन कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हणून मेळाव्याची सांगता झाली. सूत्रसंचालन मनोज बारी यांनी केले. आभार हेमंत वाणी यांनी मानले. अशोक नाईक, वासुदेव दवे, धीरज बारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास सोनार, भगवान सोनार, अनिल लोहार, वासुदेव वाघ, ज्ञानेश्वर निकम, बंडू काळे,युवराज बारी, शिवदास नेटके, किशोर फुसे, वाल्मिक पाटील, विजय काटोले यांचेसह ग्रामसेवक संगीता ढेंगळे, वैशाली अस्वार (काटोले), वंदना भांडारकर, उज्वला पानपाटील, शीतल कासोदेकर (वाणी), सुवर्णा काळे (बारी), कविता फुसे, नंदा बिरारी, शहनाज पिंजारी यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.