भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील फुलगाव येथील पुष्पलता नगरात १७ वर्षीय तरुणीने राहत्या घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संजीवनी विलास दांडगे (वय १७, रा. फुलगाव ता. भुसावळ) असे मयत तरुणीचे नाव आहे. फुलगावात परिवारासह ती राहत होती. ही वरणगाव येथील गांधी महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मंगळवारी, संजीवनीने घराच्या छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संजीवनीला आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर तिला तात्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मृत घोषित केले. मयत तरुणीचे वडिल विलास दांडगे यांनी दिलेल्या खबरीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामदास गांगुर्डे, गणेश राठोड, आणि ईश्वर तायडे हे तपास करत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.