जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे खेळत असताना घरासमोर सुरू असलेल्या शेकोटीत पडून ८ महिन्याचा चिमुकला पडून गंभीर भाजला गेला होता. या चिमुकल्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना सोमवारी दि. २० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता मृत्यू झाला आहे. घटनेमुळे नांद्रा गावात शोककळा पसरली आहे.
देवांशु सुनिल सोनवणे (वय ८ महिने, रा. नांद्रा खुर्द ता.जि.जळगाव) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. नांद्रा खुर्द गावात सुनिल सोनवणे हे परिवारासह राहतात. दि. ११ जानेवारी रोजी सायंकाळी शेकोटी लावण्यात आलेली होती. त्यावेळी देवांश हा खेळत असतांना तो शेकोटीत पडला. त्यामुळे तो गंभीररित्या भाजला गेला होता. त्याचे वडील सुनिल सोनवणे यांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात केले होते.
दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी २० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता त्याचा मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे हे करीत आहे.