जळगाव शहरात सरकारी कार्यालयातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील उपवनसंरक्षक कार्यालयात विरोधात अर्ज दिल्याचा कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करून कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घटना घडली आहे. या प्रकरणी शनिवारी १८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात आयएफएस दर्जाचे अधिकारी उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश अरुण भुतेकर (वय-३४, रा. चिखली जि. बुलढाणा) हा तरुण दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता उपवन संरक्षक कार्यालयात गेला होता. तेथे उपवन संरक्षक जमीर मुनीर शेख (रा. उपवनसंरक्षण कार्यालय, जळगाव) यांच्या विरोधात अर्ज केला होता. याचा राग आल्याने आयएफएस अधिकारी जमीर मुनीर शेख यांनी रमेश भुतेकर याला शिवीगाळ करत कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी शनिवारी दि. १८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार जमीर मुनीर शेख रा. उपवन संरक्षण कार्यालय, जळगाव यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहे.